मराठी माणसांची कमाल!
नोकरी सांभाळत, कुटुंबाची जबाबदारी पेलत… Week End ला बनवलेली शॉर्ट फिल्म आणि तब्बल 50+ नॅशनल-इंटरनॅशनल पुरस्कार!
हे वाचून आनंद झाला ना?
पण ही केवळ बातमी नाही, ही आहे जिद्द, मेहनत आणि मराठी माणसाच्या अपार क्षमतेची प्रेरणादायी गोष्ट.
मुंबईतील विहान थिएटर्स या हौशी रंगकर्मींच्या समूहाने आणि “आधी कुटुंबाचं पोट भरलं पाहिजे, मगच कला जोपासावी” हे आई – वडिलांचे वाक्य गाठीशी धरून वाटचाल करणाऱ्या लेखक-दिग्दर्शक निलेश रमेश जाधव यांनी अशाच विचारसरणी आणि तळमळ असलेल्या मराठी कामगारांसोबत मिळून ही अशक्य वाटणारी कामगिरी करून दाखवली आहे.
सरकारी व खाजगी कामगारांच्या हक्कांचं व्यासपीठ म्हणून महाराष्ट्र राज्य कामगार कल्याणच्या राज्य नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्ष नाटक सादर करत, कोणाचाही पाठबळ नसताना’ मुंबईतील नामांकित नाट्यगृहात व्यावसायिक प्रयोग सुद्धा यशस्वीरीत्या सादर झाले.
याच प्रवासात लेखक दिग्दर्शक यांनी एक कथा आम्हाला सांगितली
आणि तिथून सुरू झाला एक संघर्षमय पण ऐतिहासिक प्रवास…
या शॉर्ट फिल्ममधील कलाकार म्हणजे कुठलेही स्टार नाहीत, तर —
• महावितरणचे तांत्रिक कर्मचारी
• उच्च न्यायालयातील कर्मचारी
• Mediclaim कंपनीतील कर्मचारी
• खाजगी कंपनीतील ऑफिस बॉय
• टेक्सटाईल कंपनीतील कामगार
• आणि स्वतः लेखक-दिग्दर्शक, जे खाजगी कंपनीत नोकरी करतात
सकाळी नोकरी, घरी कुटुंबाची जबाबदारी, आणि उरलेल्या वेळेत वाचन, तालीम, भूमिका समजून घेणं…
सुट्टी घेतली तर पगार कपात, बॉसचा ओरडा — म्हणून सगळी तयारी फक्त सायंकाळी किंवा Week End ला!
कलाकार मुंबईच्या वेगवेगळ्या टोकांवरचे, एक कलाकार थेट अलिबागचा —
तडजोडींचा डोंगर होता…
पण त्यावर मात केली ती काहीतरी Creative करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीने!
शूटिंग मुंबईबाहेर करायचं ठरलं, पण सुट्ट्या कुठून आणायच्या? कारण ऑफिस ला जास्त सुट्या टाकल्या तर खिशाला कात्री.
मग ठरलं — Week End शूटिंग!
रविवाराला लागून असलेली शासकीय सुट्टी शोधली गेली आणि कसाबसा तीन दिवसांचा वेळ मिळवला.
सहकाऱ्यांसोबत ड्युटी मॅनेजमेंट, बॉसची समजूत,
आणि घरच्यांना — “आल्यावर नक्की फिरायला घेऊन जाईन”
अशा गोड (थोड्या खोट्या 😄) शपथा!
मग सुरु झाले इतरांसोबत ड्युटी मॅनेजमेंट, बॉस ला लोणी लावणे, घरच्यांना (विशेषतः बायकांना) मी आल्यावर तुला नक्की फिरायला घेऊन जाईल अशी खोट्या शपथा खाणे, या बाबतीत लेखक दिग्दर्शक नशीबवान… त्यांची बायकोच शॉर्ट फिल्म मध्ये काम करणार होत्या म्हणून त्यांचा हा त्रास वाचला.
तीन दिवस…
मर्यादित वेळ…
मर्यादित बजेट…
पण स्पष्ट दृष्टी आणि दिग्दर्शकाचं ठाम मार्गदर्शन
यामुळे अडीच दिवसांत शूटिंग पूर्ण झाली आणि सगळे परतले जीवाची मुंबई करायला…
पुन्हा आपल्या रोजच्या नोकरीत, कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांत…
मेहनत केली, मग प्रश्न आला —
“स्पर्धेत टाकायची का शॉर्ट फिल्म?”
हो… पण प्रत्येक फेस्टिवलला एन्ट्री फी!
तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन त्यावर ही मार्ग काढला …. आणि प्रवास सुरूच राहिला.
आणि मग…
रिझल्ट यायला लागले आणि थांबायचं नावच नाही!
• Best Short Film
• Best Direction
• Best Story
• Best Actor
• Best Actress
• Best Supporting Role
• Best DOP
अशा विविध Categories मध्ये 50 पेक्षा जास्त पुरस्कार!
Cine Dreams International Film Festival च्या अंतर्गत मुंबईमधील अंधेरी येथील PVR मध्ये अनेक नामांकित हिंदी प्रोडक्शनच्या शॉर्ट फिल्म्ससोबत मिळवलेले मानाचं स्थान,
सध्या धुरंदर चित्रपटातून लहान मोठ्याच्या पसंतीस उतरलेले ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांच्या उपस्थितीत स्क्रीनिंग,
Interview….
बंगलोरमध्ये विशेष स्क्रीनिंग…
आणि ही घोडदौड अजूनही सुरूच आहे!
अशा या सामान्य मराठी कामगारांनी, कलाकारांनी बनवलेली
“कबंध” ही शॉर्ट फिल्म २४ तारखेला दुपारी २:०५ वाजता
आपल्या सर्वांसाठी YouTube वर प्रदर्शित होत आहे.
👉 ही मेहनत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी,
👉 सामान्य मराठी माणसाच्या कामाला दाद मिळावी
👉 आणि अशा कलाकारांना बळ मिळावं,
कारगिलमध्ये लढलेले महाराष्ट्राचे वीर: त्यांच्या कुटुंबीयांचा आजही अभिमानाने भरून येणारा प्रवास
26 Jul 2026
कारगिल विजय दिवस 2026: भारताच्या शूर जवानांच्या शौर्याला सलाम | 26 जुलैचे महत्त्व
26 Jul 2026
CJP आंदोलनाची धग महाराष्ट्रात; मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांत आंदोलन, विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर
23 Jul 2026
यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Teaser पाहा,
Channel ला Subscribe करा
आणि जास्तीत जास्त Share करा.
ही फक्त शॉर्ट फिल्म नाही —
ही आहे संघर्षाची, जिद्दीची आणि मराठी माणसाच्या कमालीची गोष्ट! 💙🔥
Dr. Pradip S. Nindekar, Senior Technician, Mahavitarn, Mumbai. Mob – 9326030860




Pradip Nindekar
प्रदिप निंदेकर हे News Update चे संस्थापक आणि संपादक आहेत. ते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक विषयांवर लेखन करतात.
View All Articles →
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट
23 Jul 2026
जेजुरी अपघात: भरधाव ट्रकची वारकऱ्यांना धडक; 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, अनेक जखमी
13 Jul 2026
‘स्वामींची शाळा’चा १४ जुलैला ठाण्यात विशेष प्रयोग; निखळ विनोद, संस्कार आणि समाजसेवेचा अनोखा संगम
13 Jul 2026
Marathi Entertainment News 2026: मराठी चित्रपटसृष्टीत मोठी चैतन्याची लाट; बिग बजेट चित्रपट, OTT आणि नव्या कलाकारांची धमाकेदार एन्ट्री
13 Jul 2026
Supreme Court Breaking News: न्यायमूर्तींना शिवीगाळ, कागदांची फेक; सुप्रीम कोर्टात अभूतपूर्व गोंधळ
12 Jul 2026
मुंबई लोकलमध्ये मराठीवरून वाद; टीसीच्या वागणुकीचा व्हिडिओ व्हायरल, चौकशीचे आदेश
12 Jul 2026